Thursday, May 2, 2024
Homeनगरमालुंजे खुर्द सोसायटीच्या एका संचालकासह 24 सभासद अपात्र

मालुंजे खुर्द सोसायटीच्या एका संचालकासह 24 सभासद अपात्र

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील मालुंजे खर्द सोसायटीच्या एक संचालकाचे तीन आपत्य असल्याकारणाने संचालकपद रद्द तर 24 सभासदांचे संस्थेच्या ार सभासद नोंद वहीतून त्यांची नावे कमी करण्याचे निर्देश सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक दिपक नागरगोजे यांनी संस्थेला दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

दरम्यान मालुंजे खुर्द येथील अशोक अंबादास बोरूडे व इतर 11 यांनी दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी संस्थेचे संचालक रमेश दाजीबा पवार यांना सन 2001 नंतरचे तीसरे अपत्य असल्याचे सिध्द करण्यासाठी आवश्यक ते कागदपत्र सादर करून राहुरीचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार अर्ज करून त्यांच्या अपात्रेची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 क अ (1) अन्वये रमेश दाजीबा पवार यांना संचालक पदी अपात्र असल्याचे सहाय्यक निबंधक दिपक नागरगोजे यांनी घोषित केले.

तसेच बाळासाहेब गहिनाजी सांळुखे यांनी दि. 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या वेगळ्या तीन तक्रार अर्जात एकूण 25 सभासद हे कामगार तलाठी यांनी सभासदांच्या नावावर असलेल्या क्षेत्राबाबत दिलेल्या माहितीच्या आधारे अपात्र करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एकूण 24 सभासदांच्या नावावर किमान 10 गुंठे क्षेत्र नसल्याने महाराष्ट्र अधिनियम 1960 चे कलम 11 आणि 25 अ अन्वये संस्थेच्या उपविधीनुसार सभासदत्वासाठी आवश्यक त्या पात्रता धारण करीत नसल्याने त्यांची नावे संस्थेच्या सभासद नोंदवहीतून कमी करण्याचेही आदेश त्यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या