Thursday, May 2, 2024
Homeनगरसावत्र वडिलाचे अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

सावत्र वडिलाचे अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावत्र वडिलाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल हावभाव करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना 29 सप्टेंबर रोजी उपनगरात घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

बेलवंडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराची आत्महत्या

दिलेल्या फिर्यादीवरून पीडित मुलीच्या वडिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगी आहे. ती नगर शहरातील विद्यालयात शिक्षण घेते. फिर्यादी मुलीसह दुसर्‍या पतीसोबत उपनगरात राहता. 29 सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सावत्र वडिलाने अश्लिल हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

धक्कादायक! मोठ्या बहिणीने केला लहान बहिणीचा खून

फिर्यादी यांनी त्याला समजवून सांगितले असता त्याने त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सावत्र वडिल त्याच्या मुलीसोबत वारंवार असे कृत्य करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

कोल्हारजवळ दोन ट्रक ट्रेलरचा भीषण अपघात

- Advertisment -

ताज्या बातम्या