Thursday, May 2, 2024
Homeजळगावजवानांचे बलिदान निवडणुका जिंकण्यासाठी घेतले का?

जवानांचे बलिदान निवडणुका जिंकण्यासाठी घेतले का?

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पुलवामा घटना (Pulwama incident) व चाळीस जवानांचे बलिदान (Sacrifice of forty soldiers) हे भाजप व नरेंद्र मोदी (BJP and Narendra Modi) यांना लोकसभा निवडणूक (Lok Sabha elections) जिंकण्यासाठी घेतले गेले का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव (General Secretary of the Organization) राम माधव यांनी तीस कोटी रुपयांची ऑफर का दिली? याचे उत्तर केंद्र सरकारने (central government) द्यावे अशी मागणी करीत जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे (Jalgaon District Congress) सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालायासमोर ‘जवाब दो’ (‘Jawab Do’ movement)आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

दहिगाव प्रतिमा विटंबन प्रकरण: आरोपपत्र दाखल होईस्तोवर संशयितांना गाव बंदी रावेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलची घोषणा

माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सांगितले गेले? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावीत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आपल्या चुकांचे पाप लपवण्यासाठी असंवेदनशील असून हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आला आहे.

रावेर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाचेही पॅनल घोषितवाघळी येथे दुचाकीच्या धडकेत वृध्द महिला ठारगुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

यांचा होता सहभाग

या आंदोलनात जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, शहराध्यक्ष श्यामकांत तायडे, जि.प.गटनेता प्रभाकर सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, मनोज सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, उध्दव वाणी, डी.डी.पाटील, सचिन सोमवंशी, रतीलाल महाजन, दिलीप शेंडे, शंकर राजपूत, भरत पाटील, दिनेश पाटील, डॉ. जगदीश पाटील, व्ही.डी.पाटील, अनंत परिहार, प्रदीप पवार (चोपडा), मनोज पाटील, संदीप घोरपडे, रवींद्र जाधव, अर्चना पोळ, रवींद्र पोळ, देवेंद्र पाटील, जगदीश गाढे, प्रदीप सोनवणे, दिपक सोनवणे, छाया कोरडे, सखाराम मोरे, अमिना तडवी, मिरा सोनवणे, योगिता शुक्ला, मिना जावडे, सुमन मराठे, विश्वास सपकाळे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

मस्कावद येथे शाॅकसर्किटमुळे गुरांच्या गोठ्याला आगराजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली ‘ फेमिना मिस इंडिया’

- Advertisment -

ताज्या बातम्या