Thursday, May 2, 2024
Homeनगरपाथर्डीत बियर शॉपी चालकाला बेदम मारहाण

पाथर्डीत बियर शॉपी चालकाला बेदम मारहाण

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

न विचारता बियर शॉपी चालू केली याचा राग अल्याने बिअर शॉपी चालकाला बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी ( दि.4) रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारात शहरातील शेवगाव रोडवर घडली आहे.

- Advertisement -

Samruddhi Mahamarg : शेतकऱ्याने ट्रॅक्टर आडवे करून रोखला ‘समृद्धी महामार्ग’… कारण काय?

गणेश हरी पवार, हरी पवार, बजरंग रघुनाथ पवार (रा.धान्य गोडाऊन जवळ, पाथर्डी), संदीप उर्फ बुट्या शिवाजी पवार, आकाश मोहन डुकरे,  करन उर्फ टेन्या माने, नतीन धोत्रे, पिल्या बबन मासाळकर (रा. नाथनगर), पांडू माने (पुर्ण नाव माहीती नाही.) बाळू मासाळकर (रा. पाथर्डी) गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. जखमी  बिअर शॉप चालक तौफीक उर्फ काल्या निजाम शेख यांच्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शेख यांच्या जबाबदावरून दहा लोकांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

मानवी तस्करी आणि वेठबिगारीवर बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई, चार इसमांची सुटका

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शेख यांनी शेवगाव रोड पाथर्डी येथे  बियर शॉपी चालवण्यासाठी भाड्याने घेतलेली आहे.बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास संशयित गणेश पवार व  दहा लोक बिअर शॉपीच्या काउंटर जवळ लाकडी दांडके घेऊन आले. तू आम्हाला न विचारता येथे बिअर शॉपी चालू का केली असे म्हणून म्हणून बेदम मारहाण केली. शेख यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अर्धी तोडून नेली मारहाणीत शेख गंभीर जखमी झाले आहेत.

मी सर्वात मोठा जुगारी, मला अटक करा… शेतकऱ्याची अजब मागणी, नेमकं प्रकरण काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या