Thursday, May 2, 2024
Homeनगरगवार, भेंडीचे भाव गरम

गवार, भेंडीचे भाव गरम

भाजीपाल्याचे भाव उतरले

अहमदनगर (प्रतिनिधी)- किरकोळ भाजीबाजारात कडाडलेले भाजीपाल्याचे भाव उतरले असले तरी गवार आणि भेंडीचे भाव मात्र चढेच आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. शंभरी पार केलेला कांदाही किरकोळ बाजारात पन्नाशीत आला आहे.

- Advertisement -

अतिवृष्टी व अवेळी पाऊसानंतर सर्वच भागांत भाजीपाल्याचे वाढलेले उत्पादनाने मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे दर उतरले. पालेभाज्यांचे दर उतरल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.

लाल कांद्याची आवक वाढल्याने अन् इतर राज्यातील मागणी थंडावल्याने कांद्याचे दरही घसरले आहे. शंभरी पार केलेला कांदा आता पन्नाशीत आला आहे. शंभर रुपये किलो भावाने विकले जाणारे टोमॅटो आता अवघ्या 10 रुपयांत मिळत आहे. तिशीत पोहचलेली मेथी, पालक, कोंथबिर पाच-दहा रुपयांवर आली आहे. 80 रुपये किलो मिळणारी वांगी 20 रुपये किलो विकली जात आहेत.

ओला वटाणा 100 रुपये किला होता. तो आता 25 ते 40 रुपये किलोने मिळू लागला आहे. लिंबूचेही दर घटले आहेत. गवार आणि भेंडीच्या भावाची थंडीतही गरमागरमी सुरूच आहे. गवार 80 रुपये तर भेंडी 60 रुपये किलो भावाने विक्री होत असल्याचे दिसले. मिरची तीस रुपयांवर घसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या