Thursday, May 2, 2024
Homeजळगावजळगावच्या अनिमा ठरणार तिसर्‍या भारतीय अंतराळ वीरांगना

जळगावच्या अनिमा ठरणार तिसर्‍या भारतीय अंतराळ वीरांगना

जळगाव  – 

जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे तिसर्‍या भारतीय ‘अंतराळ वीरांगना’ ठरणार आहेत. नासामध्ये  विविध प्रकल्पांवर काम करीत असताना अनिमा पाटील यांची अंतराळवीर शास्त्रज्ञ उमेदवार म्हणून प्रोजेक्ट झेडडणच् ( Polar Suborbital Science in the Upper Mesosphere) ) अर्थात अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणार्‍या शैक्षणिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.

- Advertisement -

अंतराळ वीरांगना कल्पना चावला किंवा मूळ भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स या भारतीय महिलांच्या कामगिरीचा आपणा सर्वांनाच अभिमान आहे. अशाच आणखी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन अंतराळात झेप घेण्याचं कठीण ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे जळगावच्या अनिमा पाटील-साबळे!  सध्या त्या नासा या जागितक संस्थेत एम्स रिसर्च सेंटरच्या इंटेलिजन्ट सिस्टिम विभागात काम करीत आहेत. यापूर्वी त्यांनी केप्लर मिशन मोहिमेत चीफ इंजिनिअर म्हणून साडेतीन वर्षे काम केले आहे.

भारतीय वायुदलाची परीक्षा देण्यासाठी अर्जही आणला. दुर्दैवाने दृष्टिदोषामुळे त्यांचा पहिला प्रयत्न वाया गेला. तरीही हताश न होता संगणक ज्ञानाच्या माध्यमातून वेगळा प्रयत्न करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एमसीएफ पदवी मिळविली. त्या जोरावर मुंबईतील मायक्रोटेक्नॉलॉजी या कंपनीत नोकरीची संधी मिळवली.

दोन वर्षांच्या अनुभवानंतर अमेरिकेतील मेलस्टार कंपनीकडून त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे आले, खूप आनंद झाला. अमेरिकेत गेल्यावर सर्वांत आधी नासाचे स्पेस सेंटर पाहिले.कॅलिफोर्नियातील सॅन ओजे विद्यापीठात एरोस्पेस इंजिनिअरिंग विषय घेऊन एमएसचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला.

त्यामुळे नासामध्ये प्रवेश मिळविण्याचा मार्ग दृष्टिक्षेपात आल्यासारखा वाटू लागला. 2012 मध्ये नासाकडून बोलावणे आले आणि केपलर मिशनमध्ये सीनिअर प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी चालून आली, असे अनिमा पाटील यांनी सांगितले.

नासात काम करण्यासाठी अमेरिकी नागरिकत्वाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अनिमा यांनी अमेरिकी नागरिकत्वही स्वीकारलं आहे. अनिमा यांचे वडील मधुकर पाटील व आई नीता पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच त्यांना ही वाटचाल करणे शक्य झाले तसेच त्यांचे पती दिनेश हे अमेरिकेतच सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.

मुलं झाल्यानंतर सेकंड मास्टर्स करताना माझ्या घरच्यांचा मला विरोध झाला. मात्र आज सगळ्यांचा पाठिंबा मला मिळतो आहे त्या सांगतात.त्यांची अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणार्‍या शैक्षणिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. नासाच्या उड्डाण संधी कार्यक्रमाद्वारे हा प्रोजेक्ट राबवला जातो.

पाच दिवसाच्या या प्रशिक्षणादरम्यान फ्लोरिडा डैटोनाच्या अ‍ॅमरे रिडल अ‍ॅरोनॅटीकल युनिवर्सिटी कॅम्पसमध्ये अनिमाने हवाई प्रात्यक्षिकं हाय-जी आणि झिरो-जी विमान उड्डाणांचे प्रशिक्षण घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या