Thursday, May 2, 2024
Homeनगरकोपरगावात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

कोपरगावात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – 34 वर्षीय महिलेला लग्नाची आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक छळ करून आर्थिक फसवणूक केल्याची घटना शहरातील निवारा भागात घडली असून पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक विवाहित 34 वर्षीय महिला शहरातील निवारा भागात आपल्या सासू, मुलांसह राहते. शहरातील कुलस्वामीनी टेक्सटाईल्स, दिप्ती टॉवर्स, कोपरगाव या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी कामास लागली असता तेथील दुकान मालक प्रवीण सोपान भुजाडे (रा. आपेगाव, ता. कोपरगाव) याने फिर्यादी महिलेशी जवळीक साधून तिची विचारपूस केली.

- Advertisement -

गोड बोलून मी तुझ्याशी लग्न करतो. तुझ्या मुलांचा सांभाळ करेल, असे आमिष दाखवून फसवून सुरत येथे लॉजवर व निवारा कोपरगाव या ठिकाणी फिर्यादीचा बळजबरीने शारीरिक छळ करून आरोपीने फिर्यादीचे कोपरगाव आयडीबीआय बॅकेत अकाऊंट उघडून चेक बुकवर फिर्यादीच्या सह्या घेऊन चेक बुक स्वत:कडे ठेऊन घेतले. फिर्यादी महिलेचे पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड, गॅस कार्ड, बँक पासबुक असे मूळ कागदपत्र स्वत:कडे ठेवून घेतले.

पीडित महिलेचे 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने बँकेत ठेवतो असे म्हणून घेऊन ते गहाण ठेवले. फिर्यादीकडून मुलाची फी भरण्यासाठी 27 हजार रुपये घेऊन प्रत्यक्षात 10 हजार रुपये फी भरुन बाकीचे पैसे स्वत:कडे ठेवले. पीडितेने आरोपीस त्यांच्या लग्नाबाबत विचारणा करता त्याने पीडितेस मारहाण करुन हाकलून दिले.

आपली फसवणू झाल्याचे फिर्यादी महिलेच्या लक्षात आल्यावर पीडित महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रवीण सोपान भुजाडे याच्याविरुद्ध भादंवि कलम 376, 420, 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दीपक बोरसे हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या