Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिकरोड : केंद्रीय विद्यालयात कंत्राटी शिक्षक भरतीत गोंधळ?

नाशिकरोड : केंद्रीय विद्यालयात कंत्राटी शिक्षक भरतीत गोंधळ?

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरू नगर येथील केंद्रीय विद्यालयात कंत्राटी शिक्षक भरतीत गोंधळ झाला. भरतीच्या जाहिरातीत असलेले नियम आणि वेळ विद्यालय प्रशासनाने पाळली नसल्याने 25 ते 30 उमेदवारांचे नुकसान झाले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. परंतु यानंतर विद्यालयाने कानावर हात ठेवले आहेत.

नेहरू नगर येथील केंद्रीय विद्यालयाने विविध पदा करता भरती करणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली. यात विविध विषयातील शिक्षकांसह, संगणक चालक, डेटा एन्ट्री चालक आदी पदा साठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातुन उमेदवार भरती साठी आले. अहमदनगर, धुळे, जळगांव येथून ही काही परीक्षार्थींना बोलविण्यात आले होते. सकाळी 8 ते 9 नोंदणी, 9 ते 10 सरळ इंटरव्ह्यू अशी वेळ असल्याने परीक्षार्थींना त्याठिकाणी बोलविण्यात आले. मात्र नोंदणी न करताच साधारण 100 उमेदवारांना एका खोलीत बसविण्यात आले. संगणक चालक, संगणक शिक्षक या पदा साठी आलेल्या उमेदवारांना वेळेची स्पष्ट माहिती दिली नसल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही, असा त्यांचा आरोप आहे. 25 ते 30 विद्यार्थी हे बाहेरून आले होते, यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

विद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यालयाच्या नावाने शिमगा करून त्यांनी काढता पाय घेतला. मुख्याध्यापकांशी संपर्क झाल्यानंतर सगळं व्यवस्थित झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या कंत्राटी शिक्षक भरतीत मोठ्या गैरप्रकाराची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या