Thursday, May 2, 2024
Homeजळगावजळगाव : भोलाणे येथे दारुच्या अड्ड्यांवर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : भोलाणे येथे दारुच्या अड्ड्यांवर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील भोलाणे येथील अवैद दारुच्या अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल दोन लाख रुपयांची दारू जप्त केली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दारुची दुकाने बंद आहेत. याचा गैरफायदा घेत काही जण भोलाणे येथे तापी नदी पात्रात गावठी दारू तयार करुन त्याची परिसरात विक्री करीत आहे, अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार सोनवणे यांनी त्यांचे सहकारी वासुदेव मराठे व इतरांना सोबत घेवून बुधवारी पहाटे ५ वाजताच तापी नदी पात्रात उतरुन कारवाई केली.

परंतु, पोलीस आल्याची चाहूल लागल्याच मद्यनिर्मिती करणार्‍यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी एकूण पाच अड्डे उद्धवस्त केले. यात सात हजार ६०० लिटर कच्चे, पक्के व काही उकळते रसायन होते. त्याची किंमत एक लाख ५२ हजार रुपये आहे. तसेच ३२ हजार २०० रुपये किमतीची तयार झालेली गावठी दारू, २० हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल, ३५ लीटरच्या २३ टाक्या, ३८ पत्री टाक्या असा एकूण दोन लाख चार हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या