Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनांदगाव : आमोदे येथील करोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांचे करोना चाचणी...

नांदगाव : आमोदे येथील करोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांचे करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

नांदगाव । प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील ५८ वर्षीय पुरुषाला बाधा झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील असलेले कुटुंबातील १२ सदस्यांना कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अशोक ससाणे यांनी दै.देशदूतशी बोलताना दिली.

- Advertisement -

तालुक्यातील आमोदे येथील येथील ५८ वर्षीय पुरुषाची छातीत दुखत असल्याने त्याला चाळीसगाव (जि.जळगांव) येथील खाजगी रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र तीन दिवस उपचार करून देखील त्या व्यक्तीच्या वेदना कमी होत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते

तेथील रुग्णालयात त्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉजिटिव्ह आल्याने त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यासह त्याच्या सोबत असलेल्या दोन्ही मुलाचे देखील करोना चाचणी साठी नमुने घेण्यात आले होते तर गुरुवारी त्यांच्या कुटूंबातील ऐकून आणखी १२ सदस्यांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले होते त्यापैकी दोघांचे कोरोना चाचणी आवाहल निगेटिव्ह आले होते तर उर्वरित त्यांच्या कुटूंबातील दहा सदस्याचे कोरोना चाचणी अवाहल आज प्राप्त झाले असून ते देखील निगेटिव्ह आले असल्याची माहिती नांदगाव पंचायत समितीचे वैदयकीय अधिकारी डॉ अशोक ससाणे यांनी दिली. हे आवाहल निगेटिव्ह आल्याने आमोदेसह, नांदगाव, वेहेळगाव, पळाशी आणि पंचक्रोशीतील नागरिकाना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या