Thursday, May 2, 2024
Homeनगर‘खासगी’च्या दैनंदिन बेड्सची माहिती द्यावी लागणार जिल्हा प्रशासनाला

‘खासगी’च्या दैनंदिन बेड्सची माहिती द्यावी लागणार जिल्हा प्रशासनाला

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोना रुग्णांचा संसर्ग वाढत असून यामुळे उपचार घेणार्‍या रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील बेड्सची दैनदिन माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी मंगळवारी काढले आहेत.

- Advertisement -

आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारात त्यांनी यापूर्वी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना 20 टक्के बेडस् स्वत:साठी तर 80 टक्के बेड्स या राखून ठेवण्याचे आदेश दिले होते.

यासह खागसी रुग्णालयात करोना रुग्णांवर आयसोलेशनमध्ये उपचार करावेत, उपचाराचे दर जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेले असून त्यानूसार आकारणी व्हावी, यासह आता दररोज खासगी रुग्णालयातील शिल्लक बेड्ची दैनदिन माहिती जिल्हा प्रशासन घेणार असून ही जिल्हा प्रशासनाच्या संकेत स्थळावर टाकण्यात येणार आहे.

यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणत्या रुग्णालयात करोना उपचारासाठी बेड्स शिल्लक आहे, कोठे हाऊसफुल्लं आहे, याची माहिती सहजासहज उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या