Sunday, May 5, 2024
Homeनाशिकमजूर संस्थांना पूर्वीप्रमाणे कामे मिळणार

मजूर संस्थांना पूर्वीप्रमाणे कामे मिळणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अडचणींबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात पाठपुराव्यास यश मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मजूर संस्थांना पूर्वी प्रमाणे कामे मिळावीत.यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली . तसेच जून २०२० मध्ये झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ई-निविदेची मर्यादाही १५ लाखांपर्यंत वाढविली जाणार असल्याची माहिती जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष संपतराव सकाळे यांनी सांगितले.

सहकारी संसथांच्या ई-निविदा संबधीच्या व्यावहारिक व आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी तसेच पूर्वीप्रमाणे काम वाटप समितीमार्फत सवलतीची कामे मिळावीत. यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष सकाळे, संचालक शिवाजी कासव , अभियंता बडवर या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधानभवनात भेट घेतली.

बैठकीत जून २०२० मध्ये झालेल्या बैठकीनुसार घेतलेल्या निर्णयाची लवकरच अमंलबजावणीसाठी पुन्हा संबंधीत खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांची पुढील आठवडयात बैठक होईल. या बैठकीत हा निर्णय अंतिम केला जाईल, असे नाना पटोले यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व ठेकेदारांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी व वेळोवेळी शासनाने प्रसिध्द केलेले आदेश व त्यामधील क्लिष्टता संबधी येत्या महिन्यात सर्वसमावेश समितीचे गठण करुन प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यालयातुन मिळाली असल्याचे सकाळे यांनी सांगितले. मजूर संस्थांचे प्रश्न लवकरच शासन दरबारी मार्गी लावण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या