Thursday, May 2, 2024
Homeजळगावकोळ्याच्या नव्या प्रजातीला संशोधक कै.डॉ.गणेश वानखेडे यांचे नाव

कोळ्याच्या नव्या प्रजातीला संशोधक कै.डॉ.गणेश वानखेडे यांचे नाव

रावेर – Raver – प्रतिनिधी :

येथील दिवंगत संशोधक कै.डॉ.गणेश वानखेडे यांनी यांच्या नावाने सोलापूर माळरानात आढळून आलेल्या नवीन कोळी प्रजातीला आयडीओक्स वानखेडे हे नांव देऊन संशोधकांचा सन्मान करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुळचे रावेर येथील कै.डॉ.गणेश वानखेडे यांच्या संशोधनाने तब्बल 600 च्या वर निरनिराळे कोळी मेळघाट व देशभरातून शोधून त्यांनी संदर्भग्रथ प्रकाशित केला होता.

त्यांचे मोठे योगदान असल्याने नव्याने शोधण्यात आलेल्या ट्रपडोअरस्पाईड (टुरांटूला) कोळीला वानखेडे यांचे नाव जोडून खर्‍या अर्थाने या संशोधकाचा गौरव झाल्याने हा गौरव रावेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे.बोरमणीच्या परिसरातल्या माळढोक,तणमोर,लांडगा,कोल्हा,खोकड,काळवीट असे अनेक वन्यजीवांचा आभ्यास केला गेला आहे.

या माळरानात सोलापूर येथील डॉ.राजशेखर हिप्परगी यांनी ट्रपडोअरस्पाईड टुरांटूला या कोळीच्या नवीन प्रजातीचा शोध घेवून आभ्यास केला.या प्रजातीचे आयडीओक्स वानखेडे हे नामकरण केले.

त्याची जागतिक अभ्यासात या नावाने नोंद होवून स्थान प्राप्त झाले आहे.अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात प्रा.गणेश वानखेडे हे प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख होते.त्यांनी मेळघाट व देशभरातील कोळी जीवाच्या 600 प्रजातीचा शोध लावला होता.

त्याचा संदर्भ ग्रंथही प्रकाशित केला होता.या आंतरराष्ट्रीय संधोधनाची जागतिक प्राणी संशोधनाने दखल घेतली आहे.डॉ.राजशेखर हिप्परगी यांनी या प्रजातील डॉ गणेश वानखेडे यांचे नांव देऊन गौरव केला आहे.

ते मुळचे रावेर येथील रहिवासी होते.त्यांचे वडील ना.भी.वानखेडे सरदार जी जी हायस्कूलचे मुख्याध्यापक होते.आयडीओक्स वानखेडे या नव्या संशोधनामुळे रावेरचे नाव जागतिक प्राणी संशोधनाच्या इतिहासात नोंदले गेले आहे.डॉ रवींद्र वानखेडे यांचे बंधू डॉ गणेश वानखेडे यांच्या कार्याची त्यांच्या मरणोत्तर नोंद घेणे हि बाब खूप महत्वपूर्ण ठरते.

- Advertisment -

ताज्या बातम्या