Thursday, May 2, 2024
Homeराजकीयधुळ्यात खडसेंच्या प्रवेशाचा जल्लोश

धुळ्यात खडसेंच्या प्रवेशाचा जल्लोश

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये धुळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोश केला.

- Advertisement -

तसेच मुंबईहून परतीच्या मार्गावर श्री.खडसे यांचा ठिकठिकाणी सत्कार होणार असून आज धुळ्यातही महामार्गावर सत्कार करण्यात येणार आहे.

सकळी 9 वाजता मुंबईहून जळगावकडे येणारे श्री.खडसे यांचा धुळे तालुक्यातील पुरमेपाडा चौफुलीवर सायंकाळी 4 वाजता फटाके फोडून सत्कार केला जाईल.

यावेळी विनोद बच्छाव, अतुल जाधव, संदीप देवरे, मच्छिंद्र शिंदे आदी उपस्थित राहतील. त्यानंतर अवधानला कुणाल वाघ व सहकारी, चाळीसगाव चौफुलीवर सय्यद सरदार व सहकारी, पारोळा चौफुलीवर महेंद्र शिरसाठ, राजू चौधरी व सहकारी, फागणे चौफुलीवर प्रविण पाटील, कैलास पाटील, कैलास वडगाव आणि मुकटीला डॉ.राहुल कुवर, गुलाब बाला, राजू पाटील हे सत्कार करणार आहेत. शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, राजेंद्र चितोडकर हे या सत्कारांचे नियोजन करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या