Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकांद्याचे भाव पुन्हा कोसळले

कांद्याचे भाव पुन्हा कोसळले

नाशिक, अहमदनगर (प्रतिनिधी) –

लासलगाव बाजार समितीत 142 वाहनातून 1500 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला जास्तीत जास्त 5912 रूपये, तर सरासरी

- Advertisement -

5100 रूपये दर मिळाला. जवळपास दीड हजार रूपयांनी कांद्याचे भाव कोसळले. त्यामुळे लिलाव सुरू होऊनही कांदा उत्पादकाला न्याय मिळालेलाच नाही.

दरम्यान नगर जिल्ह्यातही कांद्याचे भाव काही प्रमाणात कोसळले. संगमनेरात लाल कांदा 500 ते 4500 तर उन्हाळ कांदा 500 ते 6500 रूपये प्रतिक्विंटल विकला गेला. राहुरीतील वांबोरीत 500 ते 6000 रूपये तर राहात्यात 1100 ते 6000 रूपयांचा दर मिळाला.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तसेच लासलगाव मर्चंटस असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या