Thursday, May 2, 2024
Homeधुळेकत्तलीसाठी जाणार्‍या 18 गुरांची सुटका

कत्तलीसाठी जाणार्‍या 18 गुरांची सुटका

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

आयशर ट्रकमध्ये निदर्यपणे कोंबुन कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणार्‍या 18 गुरांची तालुका पोलिसांनी सुटका केली आहे. नेर गावानजीक ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

दोन ट्रकसह गुरे असा 5 लाख 44 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चौघांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरांना मालेगाव रोडवरील खानदेश गोशाळेत जमा करण्यात आले.

तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज पहाटे ही कारवाई करण्यात आली.

उपनिरीक्षक प्रकाश पाटील, असई.चव्हाण, हेकॉ.मोरे, पोना.प्रविण पाटील, चेतन चव्हाण, प्रमोद ईशी, मंडाले, पोकॉ.राकेश मोरे, सांगळे यांच्या पथकाने पहाटे तीन वाजता नेर गावाजवळ सापळा लावला. त्यादरम्यान संशयित वाहनांना (क्र.एम.एच.43/एफ 7649) व (क्र.एम.एच.04/डी.एस.5369) थांविण्यात आले.

वाहनांची तपासणी केली असता गुरांना निदर्यपणे कोंबलेले दिसून आले. चालकाची विचारपूस केली असता त्याने नवापूर तालुक्यातील खेकडा येथुन कत्तलीसाठी गुरे घेऊन जात असल्याचे सांगितले.

पोलिसांनी दोन्ही वाहनातील प्रत्येकी 9 याप्रमाणे 18 गुरे जप्त केली. 4 लाख रूपये किंमतीच्या दोन वाहनांसह 1 लाख 44 हजारांची 18 गुरे असा एकूण 5 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोकॉ.राकेश मोरे याच्या फिर्यादीवरून आयशर चालक इनायत रफिक शेख, शकील शाह, सहचालक शोएब अमीन शाह व अकिल शाह रुबाब शाह सर्व (रा.नवापूर) यांच्या विरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या