Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकमनमाडला २१४ शिक्षकांचा अहवाल निगेटिव्ह तर दोघांचा पॉझिटिव्ह

मनमाडला २१४ शिक्षकांचा अहवाल निगेटिव्ह तर दोघांचा पॉझिटिव्ह

मनमाड | Manmad

राज्य शासनाने गेल्या सोमवारी सर्व धर्मीय भक्तासाठी प्रार्थना स्थळांची खुली केल्यानंतर या सोमवार पासून शिक्षणाचे मंदिर मानले जाणार्‍या शाळांचे दारे विद्यार्थ्यासाठी उघडे केली जात असून शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांना त्यांची करोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisement -

आज (शनिवार)मनमाड शहर परिसरातील हायस्कूल आणि कॉलेज मधील 216 शिक्षकांनी कोविड सेन्टरवर जावून त्यांची कोरोना चाचणी केली असून 214 शिक्षकांचा अहवाल हा निगेटिव्ह तर 2 शिक्षकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान सोमवार इयत्ता ९ ते इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु होणार असल्यामुळे शाळा मध्ये साफसफाई मोहीम राबवून बेंच,इमारतीला सैनेटाइज केले जात आहे.

एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनमाड शहरात एकूण ४२ शाळा असून त्यात १४ हायस्कूलचा समावेश असून शहरात ४ कॉलेज आहेत. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी देशभरात २२ मार्च पासून लॉक डाऊन लागू करण्यात आला होता.

त्यामुळे गेल्या आठ महिन्या पासून सर्व शाळा, हायस्कूल, कॉलेजेस बंद आहे.केंद्र व राज्य शासनाने हळूहळू लॉक डाऊन हटविण्यास सुरुवात केली असून या अंतर्गत आता सोमवार 23 नोव्हेबर पासून इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील सेंट झेवियर येथे असलेल्या कोविड सेंटर वर आज शिक्षकांनी करोना टेस्ट करण्यासाठी गर्दी केली होती.

आज २१६ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असता २ शिक्षकांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह टर उर्वरित २१४ शिक्षकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

ही घ्यावी लागणार खबरदारी

शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहेत. त्याअनुषंगाने सर्व वर्ग खुले करून स्वच्छ, करावे लागणार आहेत. या काळात पडझड झालेल्या शाळांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे.

शाळांचे सॅनिटायझींग करणे, स्वच्छता गृहांमध्ये घाण साचलेली आहे. त्याकडे लक्ष देऊन त्यांची योग्य स्वच्छता करणे, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी साबण, हॅन्डवॉशची पुरेशा प्रमाणात सोय करून देणे, कोविड बाबत जनजागृतीही करणे पालकांची समजूत काढण्यासह विविध आव्हान शिक्षण विभागावर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या