Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारगुजरात राज्यातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

गुजरात राज्यातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग वाढत असलेल्या गुजरात राज्याची सीमा जिल्ह्याला लागून असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात रेल्वे व रस्ते मार्गाने येणार्‍या प्रवाशाची कोरोना संसर्गाबाबत तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

- Advertisement -

रेल्वे वाहतूक मार्गे येणार्‍या राष्ट्रीय राजधानी दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून येणार्‍या, थांबा असणार्‍या रेल्वेतून नंदुरबार तसेच नवापूर रेल्वे स्थानकावर उतरणार्‍या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात येण्यापुर्वी 96 तास आधी आरटीपीसीआर चाचणीचे नमुने घेणे आवश्यक आहे. नंदुरबार व नवापूर रेल्वे स्टेशनवर उतरणार्‍या ज्या प्रवाशाकडे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट नसतील अशा प्रवाशांची कोविड-19 ची लक्षणे व शरीराचे तापमानाबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यातून रस्ते मार्गे जिल्ह्यात येणार्‍याची कोविड-19 लक्षणे व शरीराचे तापमान तपासणी करण्यात यावी. ज्या प्रवाशांना लक्षणे नसतील अशाच प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास मुभा राहणार आहे.

लक्षणे आढळून आल्यास प्रवाशांना विलग करुन अ‍ॅन्टीजन चाचणी करण्यात येईल. अहवाल निगेटिव्ह आल्यास अशानाच पुढे प्रवास करण्यास मुभा असेल.

रेल्वे व रस्ते मार्गे प्रवास करणार्‍या प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना त्वरीत उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. होणारा खर्च प्रवाशांनी करावयाचा आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या