Thursday, May 2, 2024
Homeधुळेएक कोटीसाठी विवाहितेचा छळ

एक कोटीसाठी विवाहितेचा छळ

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक कोटी रुपये आणावे म्हणून शिरपूर तालुक्यात माहेर असलेल्या विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला.

- Advertisement -

याप्रकरणी तिच्या पतीसह चौघांविरुध्द शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सौ.मनिषा पवन मोरे (वय 25 रा. सिध्देश्वर कॉलनी, सातपुर, नाशिक व ह.मु.गुजर खर्दे ता.शिरपूर) या विवाहितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक कोटी रुपये आणावे, अशी मागणी तिच्याकडे सासरच्यांनी केले.

पैसे आणत नाही म्हणून तिला सासरच्या लोकांनी शिवीगाळ केली. तिचा शारिरीक मानसिक छळ केला. तर पती पवन मोरे याने मारहाण केल्याने तिच्या पायाचे हाड मोडले गेले.

तिच्या अंगावरील दागिने काढून घेवून तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार पवन खंडू मोरे, खंडू फकिरा मोरे, उज्वला खंडू मोरे सर्व रा.सातपुर, नाशिक व सारिका उमेश शिलावट रा.लोणेर ता.सटाणा या चौघांविरुध्द भादंवि 498 (अ), 326, 406, 323, 504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना मालचे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या