Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रयोगींचा मुंबईत ‌उद्योजकांच्या भेटी : सेना, मनसे आक्रमक

योगींचा मुंबईत ‌उद्योजकांच्या भेटी : सेना, मनसे आक्रमक

मुंबई

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी तयार करण्यासाठीच्या चर्चेसाठी त्यांचा हा दौरा आहे. तसेच उद्योगपतींचीही बैठकी त्यांनी घेतली. योगींच्या दौऱ्यावरुन मनसे व शिवसेना आक्रमक झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सर्वात पहिले बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी टोला लगावला आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘ योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहे, साधु आहेत, योगी आहेत ते. मुंबईच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ते बसले आहेत त्यांच्यासोबत अक्षय कुमार देखील बसला असल्याचे मी पाहिले. कदाचित अक्षय कुमार आंब्याची टोपली घेऊन गेले असतील’

कहा राजा भोज, कहा गंगू तेली

मनसेने योगींना ठग म्हणत थेट भाजपच्या कार्यालयाबाहेरच होर्डिंग लावले आहेत. दरम्यान आज योगी आदित्यनाथ हे ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबले आहेत. याच हॉटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा ‘ठग’ म्हटले आहे. तसेच भाजपच्या कार्यालयाबाहेरही हे होर्डिंग लावण्यात आले आहेत.

या होर्डिंगवर लिहिले आहे की, ‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली.., कुठे महाराष्ट्राचं वैभव…तर कुठे युपीचं दारिद्र. भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचे मुंगेरीलालचं स्वप्नं.’ ‘अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग” असे मजकूर असलेले होर्डिंग योगी आदित्यनाथ थांबलेल्या हॉटेलच्या परिसरात लावले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या