Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना ३१ डिसेंबरपर्यंत बंदी

ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना ३१ डिसेंबरपर्यंत बंदी

दिल्ली । Delhi

ब्रिटनमध्ये करोना वायरसच्या नव्या प्रजातीचं रूप आणि त्यामुळे करोना रूग्णांची संख्या वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर युके मध्ये लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता भारताने देखील युके- भारत विमानसेवा तात्पुरती खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

युकेमधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. युनायटेड किंग्डममध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. करोना व्हायरसच्या नवीन प्रकाराचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. युकेमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिथल्या विमानांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

२२ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत जी विमानं युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना करोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमान तळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

भारताप्रमाणे यापूर्वी सौदी अरेबिया, इटली, स्पेन सह काही युरोपीय देशांनी, इस्त्राईल, कुवेत, टर्की या देशांनी युके मधून येणारी-जाणारी वाहतूक थांबवली होती. तसेच पर्यटकांवर ततपुरती बंदी टाकली आहे. सध्या नाताळचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुट्ट्यांचा काळ सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणात येणं-जाणं होण्याची शक्यता असल्याने या नवा वायरस पुन्हा झपाट्याने फैलावू शकते अशी भीती आहे. युके पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या