Sunday, May 5, 2024
Homeनाशिककौतुकास्पद : सलग आठव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक 'बिनविरोध'

कौतुकास्पद : सलग आठव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक ‘बिनविरोध’

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील कादवा माळूंगी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून गावात ग्रामपंचायत निवडणुक न घेता सर्व जागा गावाच्या संमती बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. या गावाने बिनविरोध निवडणुकीची परपंरा कायम ठेवल्याने त्यांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येते आहे…

- Advertisement -

कादवा माळूगी सर्व ग्रामस्थांच्या निर्णयानुसार प्रभाग क्रंमाक एक मधून १) पंडित भिका सहाळे. २)बजाबाई प्रभाकर गांगोडे .३) सविता अनिल गांगोडे तर प्रभाग क्र. २ मधून १) शिलाबाई भास्कर आहेर.२) माधव भास्कर निकम तसेच प्रभाग क्र. ३ मधून १)ललिता यशवंत गांगोडे.२)भाऊसाहेब रामदास गांगोडे.ग्रामपंचायतीच्या तीन प्रभाग मधुन एकूण सात जागाची निवड गावाच्या सर्वमताने करण्यात आली.

गावाने ठरवून दिलेल्या लोकांनी फक्त काम करावे असे या बैठकीत सर्वमताने निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या ३५ वर्षापासून कादवा माळूंगी गावात ग्रामपंचायत निवडणुक झालेली नाही.

या गावाने आतापर्यत सात सरपंचांची निवडणूक बिनविरोध केलेली आहे. हा आठवा सरपंचही बिनविरोध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील गावामध्ये कादवा माळूगी बिनविरोध निवडणुकी परपंरा जुनी असल्याचे जेष्ठकडून सांगण्यात येत आहे.

या बिनविरोध निवडणुकीसाठी गावातील तानाजी देशमुख, वसंत पिंगळ, भाऊसाहेब गुंबाडे, साहेबराव आहेर, देविदास गांगोडे, खंडेराव आहेर,गोपीनाथ निकम, एकनाथ अनवट, माधवराव जाधव, परशराम सहाळे, जगन गांगोडे, रमेश आहेर, सुरेश शिंदे, दामोधर बुनगे, हभप. छबु महाराज, हभप. कृष्णा महाराज, रघुनाथ बोके, राजेद्र चौरे, मानिक चौरे, भिका सहाळे, संजय लिलके, कविता गांगोडे, जिजाबाई गांगोडे, कुसूम सहाळे, सुमनबाई लिलके, रंजना गुबाडे, सरला वाघ, आदीसह गावातील युवक व जेष्ठ नागरिक या बिनविरोध निवडणुकीसाठी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या