Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशभारतात ऑक्सफोर्डच्या लसीला लवकरच मंजुरी

भारतात ऑक्सफोर्डच्या लसीला लवकरच मंजुरी

नवी दिल्ली

भारतात कोरोना लसची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोवीशील्ड या लसीच्या आपत्कालीन वापरास पुढील आठवड्यात मंजुरी मिळणार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. सीरम संस्थेने या संदर्भात सरकारला अधिक डेटा उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे या लसीला मंजुरी मिळणार आहे.

- Advertisement -

ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्राजेनेका या कोवीशिल्ट लसीला सरकारने मंजूर केल्यास भारत या लसच्या वापरास अनुमती देणारा पहिला देश ठरणार आहे. तसेच कोविशिल्ट ही भारताची पहिली लस होईल.पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca सोबत ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस तयार करण्यासाठी करार केला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाने असा दावा केला आही की, अंतिम चाचण्यांमध्ये कोरोना लस ९० टक्के प्रभावी ठरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या