Thursday, May 2, 2024
Homeराजकीयकृषी विधेयकांना होणारा विरोध हा केवळ राजकीय हेतूने - आ. विखे

कृषी विधेयकांना होणारा विरोध हा केवळ राजकीय हेतूने – आ. विखे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकांना होणारा विरोध हा केवळ राजकीय हेतूने आहे.

- Advertisement -

या आंदोलनामागील राजकारण लपून राहिलेले नाही. कोणी कितीही विरोध केला तरी, देशातील शेतकर्‍यांनी या कृषी विधेयकांचे स्वागतच केले असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमिवर व सुशासन दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकर्‍यांशी संवाद साधला. 9 कोटी शेतकरी कुटुंबियांना 18 हजार कोटी रुपयांचे वितरीत केले. या निमित्ताने श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल रॅलीत आ.विखे पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

याप्रसंगी आ. विखे पाटील म्हणाले की, कृषी विधेयकाच्या माध्यमातून देशातील शेतकरी आणि कृषी क्षेत्राला स्वातंत्र्य देण्याचे मोठे काम केंद्र सरकार करत आहे. या विधेयकांमुळे शेतकरी आपला उत्पादीत माल कुठेही विकू शकेल. मात्र बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहणार असून, केंद्र सरकारने हमीभावाचीसुध्दा खात्री दिली आहे. मात्र काही शेतकरी संघटना राजकीय पक्षांच्या पाठबळावर या विधेयकांनाच करीत असलेला विरोध हा राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकार शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यास तयार आहे. मात्र संघटनांना आता चर्चा नको आहे, केवळ दिशाभूल करून आंदोलन सुरू ठेवून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न काही लोकांचा आहे. हे आंदोलन केवळ दोन राज्यांपुरते सिमीत राहिले असून, देशातील इतर शेतकर्‍यांनी या विधेयकाचे एकप्रकारे स्वागतच केले असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी सभापती नानासाहेब शिंदे, नानासाहेब पवार, दीपकराव पटारे, आंबादास ढोकचौळे, जि.प सदस्य शरद नवले, भाजपाचे तालुका अध्यक्ष बबनराव मुठे, शहर अध्यक्ष मारुती बिंगले, उपाध्यक्ष सुनील वाणी, गणेश राठी, नगरसेवक बाळासाहेब गांगड, उपसभापती बाळासाहेब तोरणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेश मुदगुले, पं.स सदस्य सतीश कानडे, विठ्ठलराव राऊत, नगसेवक दीपक चव्हाण, केतन खोरे, जितेंद्र छाजेड, चित्रसेन रनवरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या