Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedबोलेरोच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार

बोलेरोच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार

शेगाव – प्रतिनिधी Shegaon

खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिंपळगाव राजा-घाटपुरी रोडवरील पाण्याच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज सकाळी १० वाजताच्या दरम्यान मालवाहू बोलेरो व दुचाकींचा भीषण अपघात घडला. यामध्ये दुचाकी चालक जगदीश महादेव मुंडे वय 30 वर्ष यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

देव तारी त्याला कोण मारी : या अपघाताची परिसीमा एवढी भयावह होती की कु श्रेयाचे वडील जागीच ठार झाले तर आई चा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र कु.श्रेयाचे दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून ती वाचली.मात्र मायबापाच्या प्रेमाने अखेर ती पोरकी झाली. त्यामुळे याप्रकरणातील आरोपी चालकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

तर त्यांची पत्नी लक्ष्मी जगदीश मुंडे वय २५ वर्ष यांचा खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्यांची २ वर्षीय मुलगी कु.श्रेया हीला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही.त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ढोरपगाव येथील जगदीश मुंडे, लक्ष्मी मुंडे, कु.श्रेया मुंडे हे खामगावकडे बाहेरगावी जात असताना घाटपुरी नजीक असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ भरधाव वेगाने येत असलेल्या बोलेरो वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, यात जगदीश मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी लक्ष्मी मुंडे ह्या गंभीर जखमी झाल्यात,त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची २ वर्षीय मुलगी कु.श्रेया ही बालबाल बचावली.

घटनेची माहिती घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांना देण्यात आली.मात्र तोपर्यंत बोलेरो चालक आरोपी मुसताक खा करजत खा हा घटनास्थळवरून पसार झाला,मात्र पिंपळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश सातव यांनी सजगतेने आरोपी मुश्ताक खा रा मोताळा व त्याचे वाहन क्र.एम एच २८ ए बी ३९६४ याला वाहना सहित ताब्यात घेऊन पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.याप्रकरणी आरोपी बोलेरो चालकाला कठोर शिक्षा करण्याची मागणी पिंपळगाव राजा व ढोरपगाव येथील ग्रामस्थांनी केली असून आरोपींना शिक्षा न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या कारवाई चा निषेध नोंदवला जाणार आहे.घटनेचा तपास शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते गणेश सातव यांची तत्परता

पिंपळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश सातव यांना माहिती होताच की बोलेरो चालक आपले वाहन घेऊन पिंपळगाव नजीक पसार झाला तेव्हाच गणेश सातव यांनी नाकाबंदी करत आरोपी मुश्ताक खा व वाहनाला ताब्यात घेत पिंपळगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन केले,त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल नागरिकांनी घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या