Thursday, May 2, 2024
Homeनगरसाध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातून आकाशात झेपावणार रॉकेट

साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातून आकाशात झेपावणार रॉकेट

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात रॉकेट लॉन्च होणार आहे.

- Advertisement -

मुलांमध्ये संशोधन वृत्ती जागृत व्हावी यादृष्टीने हा प्रकल्प हाती घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष इंद्रभान डांगे यांनी सांगितले.

श्री. डांगे म्हणाले की, शाळेत एव्हिएशन सेंटर सुरू करणार आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ धनेश बोरा हे सहकार्य करणार आहेत. मुलांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी हे एव्हिएशन सेंटर सुरू करणार आहे. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्या दिवशी शाळेतील मुलांनी बनवलेले शंभर रॉकेट एकाच वेळी या कॅम्पसमधून आकाशात लॉन्च करणार आहे.

त्यासाठी पाचशे मुलांची निवड करणार आहे. एका गटामध्ये तीन मुले असणार आहेत. त्यामध्ये सातवी ते बारावी पर्यंतच्या मुलांना सहभागी होता येईल. तसेच परिसरातील शाळेतील मुलेसुद्धा यामध्ये सहभाग घेऊ शकतील की ज्यांना संशोधनाची आवड आहे. तरी या संधीचा मुलांनी व सहभाग घ्यावा. ग्रामस्थांनी 26 जानेवारीला रॉकेट लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहान डांगे यांनी केले.

यावेळी इस्रो येथे शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे शास्त्रज्ञ धनेश बोरा म्हणाले की, लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत संशोधनाची वृत्ती जागृत व्हावी व मुलांनी संशोधनाकडे वळावे यासाठी एक विशिष्ट आउटरीच प्रोग्राम इस्रो राबवत असते. त्या माध्यमातून प्रत्येक मुलांपर्यंत सर्व आधुनिक टेक्नॉलॉजी त्यामध्ये यांत्रिक सायन्स, आर्टिफिशल इत्यादी टेक्नॉलॉजी गोष्टी मुलांपर्यंत कोर्सच्या माध्यमातून पुरवल्या जातात.

याच कोर्सच्या माध्यमातून इंद्रभान डांगे, प्रीतिसुधाजी इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून या शाळेतील मुलांना विशेष परवानगी घेऊन रॉकेट, सॅटेलाईट, इंटर प्यानेटील रोवर, दुर्बिन इत्यादी आधुनिक टेक्नॉलॉजीचे मुलांना प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे मुलांना शास्त्रज्ञ किंवा आधुनिक क्षेत्रात प्रगती करण्याचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

26 जानेवारीला रॉकेटचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. त्यासाठी मुलांची आठ दिवस कार्यशाळा घेतली जाणार आहे. या कार्यशाळेमध्ये रॉकेट कसे बनवले जाते त्यामध्ये हे कुठल्या प्रकारचे टेक्निक, इलेक्ट्रॉनिक्स तसेच कोणते इंधन वापरले जाते हे या दिवसांमध्ये शिकवणार आहे. विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेणार आहे.

तसेच 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन आहे या दिवशी मुलांनी तयार केलेले ले नंबर रॉकेट प्रीतिसुधाजी संकुलातील कॅम्पस मधून लॉन्च करण्याचा मानस आहे. या रॉकेटला पोलर सॅटेलाईट लँड व्हेईकल असे नाव आहे. हे सी-25 मॉडेल असून जमिनीपासून 17 हजार फूट वर किंवा सरळ फायर होते.

पाच किमीपर्यंत त्याची रेंज आहे. त्यानंतर पॅरॅशूट मार्फत ज्या ठिकाणाहून हे उड्डाण केले त्या ठिकाणी खाली येते हे मोबाईलच्या वायफायने सुद्धा ऑपरेट होऊ शकते तसेच खाली येताना पृथ्वीचे वेगवेगळे निरीक्षण, नयनरम्य दृश्य टीपू शकते त्यासाठी यामध्ये स्पाय कॅमेरा बसवला जातो.

यावेळी प्राचार्य ज्ञानेश डांगे, स्नेहलता डांगे, पुनम डांगे, शिवाजी देवडे, गणेश शार्दुल, जालिंदर धनवटे, सचिन गीते आदी शिक्षक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या