Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमुंबई नाक्यावरून १५ लाख रूपये पळविले; तपासासाठी चार पथके रवाना

मुंबई नाक्यावरून १५ लाख रूपये पळविले; तपासासाठी चार पथके रवाना

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

मुंबई नाका परिसरातील हॉटेल छानजवळ उभ्या असलेल्या एका स्विफ्ट कारची काच फाेडून चाेरट्यांनी १५ लाख रूपयांची रक्कम हाताेहात लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी मुंबई नाका पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

- Advertisement -

शुक्रवारी (दि. ५) दुपारी साेडतीन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एमएच १५ एचजी २८६८ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारची मागील काच फाेडली. गाडीत ठेवलेल्या बॅगमध्ये १४ ते १५ लाख रुपयांची रक्कम ठेवलेली हाेती. या प्रकरणी मयूर राजेंद्र भालेराव (रा. पंचवटी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

मुंबई नाका पाेलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी या घटनेचा तपास सुरू केला असल्याचे सांगून फिर्यादीकडून माहिती घेतली आहे. त्यासाठी ४ पथके तपासाठी रवाना करण्यात आली असल्याचे सांगितले.

दरम्यान, फिर्यादी युवक हा कर्मचारी असून ही रक्कम घेऊन ताे द्वारका येथून मुंबई नाका येथे संबंधितास देण्यासाठी जात होता, असे समजते. पाेलीस आधिक तपास करत असल्याचे ढमाळ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या