Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमनपा आयुक्तांसह 5 हजार सेवक येत्या शनिवारी करणार श्रमदान

मनपा आयुक्तांसह 5 हजार सेवक येत्या शनिवारी करणार श्रमदान

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेचा देशातील स्वच्छ शहरात पाचवा क्रमांक येण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडुन तयारी केली जात असतांना स्वच्छतेसंदर्भात नाशिककरांत जनजागृती व्हावी म्हणुन येत्या 20 फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासह सुमारे पाच हजार अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेचे काम करणार आहे. यासंदर्भात प्रशासनाकडुन नियोजन करण्यात आले आहे….

- Advertisement -

स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 मध्ये काही त्रुटींमुळे देशातील स्वच्छ शहरात नाशिक महापालिकेचा क्रमांक दहा क्रमांकाच्या आत गेला होता. मात्र राज्यात नाशिकचा दुसरा क्रमांका आला होता.

यानंतर मागील वर्षातील त्रुटी दूर करण्याचे काम आयुक्त जाधव यांनी हाती घेतल्यानंतर आता बांधकामांच्या खराब मटेरियल जागाजागी टाकण्याचे बंद झाले असुन अशा डेब्रीज व्यवस्थापनाचे काम प्रशासनाकडुन सुरू झाले आहे.

तसेच घन कचरा व्यवस्थापन व आरोग्य विभागाकडुन स्वच्छता व आरोग्यासंदर्भातील कामांचे डॉक्युमेंटेशनचे काम देखील चांगल्या पध्दतीने झाले आहे. तसेच शहरातील हॉटेल, शाळा, रुग्णालये, शासकियं कार्यालये, हौसींग सोसायटी, बाजारपेठा – मार्केट अशांठिकाणी स्वच्छतेची जनजागृती व्हावी म्हणुन याठिकाणी पाहणी करुन त्यांना गुणांकनानुसार पारितोषीके देण्यात आले आहे.

अशाप्रकारे स्वच्छतेसंदर्भातील कामांनंतर आता येत्या 20 रोजी महापालिकेचे सर्व अधिकारी – कर्मचारी स्वच्छतेसाठी अस्वच्छतेच्या स्पॉटवर उतरणार आहे.

आयुक्त कैलास जाधव यांनी आज घेतलेल्या खाते प्रमुखांच्या बैठकीत या स्वच्छतेच्या मोहीमेसंदर्भात निर्णय घेत याची तयारीचे निर्देश दिले.

यात सहा विभागात एक ठिकाण निवडणुन याठिकाणी त्यां त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी सकाळच्या सत्रात स्वच्छता करणार आहे.

तर राजीव गांधी भवना या महापालिका मुख्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे मुंबई नाका भागात एका ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणार आहे. याठिकाणी स्वच्छतेसाठी आयुक्त जाधव काम करणार आहे. यासंदर्भातील तयारी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या