Friday, May 3, 2024
Homeनाशिकवाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

संगमनेर । प्रतिनिधी Sangamner

नशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून वाहनांचा वेग वाढल्याने भक्ष्याच्या अथवा पाण्याच्या शोधात महामार्गावर आलेल्या वन्यजीवांचे बळी जाण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत साधारण दोन वर्ष वयाच्या बिबट्याचा बळी गेला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी पुणे विभागाने पठारावर कारवाई करीत अत्यंत दुर्मिळ समजले जाणारे खवले मांजर व त्याची तस्करी करणार्या पाच जणांना अटक केली होती. त्यातच रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे उड्डाणपुलावर ही घटना घडली असून भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन वर्ष वयाचा बिबट्या जागीच गतप्राण झाला.

रविवारी सकाळी ही बाब समोर आल्यानंतर नागरिकांनी मृत बिबट्या बघण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. काहींनी याबाबम वनविभागाला कळविल्यानंतर वनरक्षक सी. डी. कासार व अरुण यादव यांनी घटनास्थळी जावून मृत बिबट्या ताब्यात घेवून चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात पाठविला आला.

काही वर्षात संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. तालुक्यातील पठारभागात विखुरलेली बाळेश्‍वराची डोंगररांग, तसाच प्रकार खालच्या प्रवरा खोर्यातही आहे. प्रवरेच्या पाण्याने समृद्ध झालेल्या ऊसाच्या मळ्यांमधे बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या