Thursday, May 2, 2024
Homeनाशिकशेताला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू

शेताला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू

सिन्नर | प्रतिनिधी

तालुक्यातील धोंडवीरनगर येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 65 वर्षीय शेतकरी ठार झाल्याची घटना घडली…

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.11) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शेतात पिकाला पाणी देण्यासाठी राजाराम त्र्यंबक सोनवणे (वय 65) गेले होते.

रात्री त्यांच्यावर वन्य प्राण्याने झडप घालून त्यांना ठार केले. आज (दि.12) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब पुंडलिक सोनवणे हे शेताकडे जात होते. त्यावेळी त्यांना शेतात राजाराम यांचा मृतदेह निदर्शनास आला.

सोनवणे यांनी भ्रमणध्वनी वरून पोलीस पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी पाहणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पोलीस व वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. राजाराम सोनवणे यांच्या रक्ताचे स्वब घेऊन हैदराबाद येथे लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

दुपारी 3 वाजता राजाराम सोनवणे यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान दोन दिवसांपासून बिबट्याचा परिसरात वावर असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून परिसरात पिंजरा लावण्यात आल्याचे वनविभाग अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या