Thursday, May 2, 2024
Homeधुळेजिल्ह्यात 30 कोटींच्या विकासकामांना मान्यता

जिल्ह्यात 30 कोटींच्या विकासकामांना मान्यता

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि महापालिकेला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत 30 कोटी 16 लक्ष रुपयांच्या विकासकामांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी आज प्रशासकीय मान्यता दिली.

- Advertisement -

पालकमंत्री ना, अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून गुगल मीटद्वारे घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये ही मंजूरी देण्यात आली.

सन 2019-20 आणि 2020-21 या वर्षाकरीता नागरी भागातील अनुसूचित जातीकरीता आरक्षीत प्रभाग आणि अनुसूचीत जाती वसाहतींमध्ये विकासकामांचे प्रस्ताव पालकमत्र्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते.

बैठकीला जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, मनपा आयुक्त अजीज शेख, जिल्हा प्रशासन अधिकारी अमोल बागूल आणि शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा व साक्री येथील नगरपरिषद मुख्याधिकारी, सहायक समाजकल्याण आयुक्त आणि नगर रचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धुळे महापालिकेने सन 2019-20 करीता 7 कोटी 74 लक्ष अंदाजपत्रकाचे 42 कामे तर सन 2020-21 करीता 10 कोटी 83 लक्ष रकमेचे 48 कामे प्रस्तावित केली होती. या सर्व 18 कोटी 57 लक्ष रकमेच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

तसेच शिरपूर नगरपरिषदेच्या 20 कामांसाठी 3 कोटी 72 लक्ष, दोंडाईचा नगरपरिषदेच्या 9 कामांसाठी 4 कोटी 50 लक्ष, शिंदखेडा नगरपंचायतीच्या 5 कामांसाठी 2 कोटी 28 लक्ष व साक्री नगरपंचायीच्या 4 कामांसाठी 1 कोटी 8 लक्ष रूपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील कोरोना संक्रमण परिस्थितीचाही आढावा घेतला आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या