Sunday, May 5, 2024
Homeनाशिकदारूच्या नशेत तरुणाने घेतला नागाशी पंगा

दारूच्या नशेत तरुणाने घेतला नागाशी पंगा

निफाड । Niphad

दारूच्या नशेत माणूस काय करतो हे त्यालाच समजत नाही. असाच काहीसा प्रकार निफाड तालुक्यातील नांदूरमध्यामेश्वेर येथे घडला.

- Advertisement -

येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात विषारी नाग आढळून आला. याचवेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने या नागास पकडून त्याच्याशी मस्ती करू लागला. याच दरम्यान विषारी नागाने त्याला चार ते पाच ठिकाणी चावा घेतला. नाग चावल्याने नागाला डाव्या हातात घट्ट पकडुन ठेवत त्याचेशी खेळणे सुरू केले. बघता बघता शाळेच्या परिसरात नागरिकांची गर्दी झाली. नागरिकांनी विनंती करूनही मद्यधुंद तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता .

परिणामी दिंडोरी तास येथून सर्प मित्रास बोलाविण्यात आले. त्याच्यबरोबर डॉक्टरांना देखील पाचारण करण्यात आले. सदर तरुणाला भुल देत सर्प मित्राच्या मदतीने सर्प बाजूला करण्यात आला.

या तरुणाला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा साठी पाठविण्यात आले. दरम्यान नागाशी घेतलेला पंगा मंगेश गायकवाड या तरुणास चांगलाच महागात पडला आहे. सध्या या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

.

- Advertisment -

ताज्या बातम्या