Thursday, May 2, 2024
Homeनगरलसीचा तुटवडा; ज्येष्ठांचा पहिल्या डोसला ब्रेक

लसीचा तुटवडा; ज्येष्ठांचा पहिल्या डोसला ब्रेक

अहमदनगर (प्रतिनिधी)

45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नगरकरांच्या पहिल्या डोसला महापालिकेने ब्रेक लावला आहे. लसीअभावी हा निर्णय घेतला गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 18 ते 44 वयोगट आणि ज्येष्ठांचा दुसरा डोस देण्याला महापालिकेने प्राधान्य दिले आहे.

- Advertisement -

हिंडफिर्‍यांची अँन्टीजेन

नगर शहरातील महापालिकेच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीकरण सुरू आहे. त्यातील तोफखाना व सावेडीतील आरोग्य केंद्रावर ज्येष्ठांसाठीचा फक्त दुसरा डोस दिला जात आहे. तेथे पहिला डोस मिळतच नाही. अन्य पाच केंद्रावर मात्र 18 ते 44 वयोगटातील तरुणाईचे लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठीच्या कुप्या मर्यादीत असल्याने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ज्येष्ठांना करोनाचा धोका अधिक आहे. ज्यांनी पहिली लस घेतली नाही, त्यांनी लस घ्यायला कुठे जायचे. इच्छा असूनही त्यांना लस घेता येत नाही. महापालिकेने यावर तातडीने तोडगा काढावा.

डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक

70-30 चा रेशो

महापालिकेला 10 हजार लसीकरणाचे डोस मिळाले आहेत. त्यातील 70 टक्के डोस हे दुसर्‍या डोससाठी वापरावेत, राहिलेल्या 30 टक्के डोसमधून पहिला डोस दिला जावा असे शासनाचे निर्देश आहेत. लसीची टंचाई पाहता ज्येष्ठांचा पहिला डोस बंद केला, मात्र लवकरच तो सुरू केला जाईल, अशी माहिती उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या