Thursday, May 2, 2024
Homeनगरसारोळा कासारच्या सरपंचाचे पद रद्द

सारोळा कासारच्या सरपंचाचे पद रद्द

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत नगर तालुक्यातील सारोळा कासार ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती रवींद्र कडूस यांचे सरपंचपद जिल्हाधिकार्‍यांनी दुसर्‍यांदा रद्द केल्यानंतर कडूस यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे केलेले अपिल आयुक्तांनी फेटाळून लावत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 22 जानेवारी 2021 रोजी पद रद्दचा पारित केलेला आदेश कायम केला आहे.

- Advertisement -

सरपंच कडूस यांच्याविरूद्ध भाऊसाहेब माधव कडूस यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले असल्याची तक्रार केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी सरपंच कडूस यांचे सरपंच पद 3 जुलै 2020 रोजी रद्द केले होते. या निर्णयाविरोधात कडूस यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अपिल केले. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना फेरचौकशीचे आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या समितीने केलेल्या फेरचौकशीत कडूस यांचे अतिक्रमण सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 22 जानेवारी 2021 रोजी कडूस यांना ग्रामपंचायत सरपंच व सदस्य राहण्यास अपात्र ठरवुन त्यांची निवड रद्द केली होती. त्यानंतर कडूस यांनी पुन्हा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अपील केले. या वेळी कडूस यांचे अपील फेटाळून लावण्यात आले व जिल्हाधिकार्‍यांनी दिलेला पद रद्दचा आदेश कायम करण्यात आला. या प्रकरणात तक्रारदार भाऊसाहेब माधव कडूस यांच्या वतीने अ‍ॅड. राहुल जोंधळे यांनी बाजू मांडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या