Sunday, July 5, 2026
Homeजळगावगांजा विक्रेत्या मुलासह पन्नासवर्षीय आईवर गुन्हा

गांजा विक्रेत्या मुलासह पन्नासवर्षीय आईवर गुन्हा

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी-

चाळीसगाव येथे कोळीवाडा परिसरात एकाच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून ११ किलो गांजासह रोकड असा एकूण २ लाख २५ हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गांजा विक्रेत्या (Cannabis sellers) मुलासह (child) पन्नासवर्षीय आईवर (old mother) शहर पोलीस स्थानकात (City Police Station) गुन्हां (Crime) दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील दोन नंबर धंद्यावाल्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव पोलिसांना कोळीवाडी परिसरात अजय उर्फ राकेश भिकन चौधरी हा राहत्या घरात छुप्या पध्दतीने गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याअनुषंगााने दि.२७/११/२०२१ रोजी दुपारी १.५० वाजेच्या सुमारास चाळीसगांव शहरातील घाटरोडवरील कोळीवाडा भागातील आरोपीतांच्या राहत्या घरात पोलिसांनी छापा टाकला असता. त्याठिकाणी १ लाख ६६ हजार ६२० रु.किं.चा प्लास्टीक गोणीत ११ किलो २१४ ग्रॅम वजनाचा ओलसर हिरवट रंगाचा, उग्रवास असलेला गांजा मिळुन आला. तसेच पोलिसांनी घराची धडती घेतील असता, ५८ हजार ७७० रुपये एक प्लास्टीक बॉक्स मध्ये मिळुन आले. तसेच २०० रुपये किमतीचा पांढर्‍या रंगाचा ईलेक्ट्रीक वजन काटा व इतर वस्तू असा एकूण २ लाख २५ हजार ८५५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सपोनि.विशाल जयसिंग टकले यांच्या फिर्यादीवरुन ५० वर्षीय महिलेसह, तिचा मुलगा अजय उर्फ राकेश भिकन चौधरी दोन्ही रा. कोळीवाडा, घाटरोड, चाळीसगांव यांच्या विरोधात एन. डी. पी. एस. ऍक़्ट १८८५ चे कलम ८ (क), २०(ब), ळळ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील सपोनि.सागर ढिकले हे करीत आहेत. हि कारवाई पोलीस निरीक्षक के. के. पाटील, नायब तहसिलदार विकास प्रल्हाद लाडवंजारी, सपोनि विशाल टकले, स.पो.नि. विष्णु आव्हाड, स.पो.नि. सागर ढिकले, स.पो.नि. सचिन कापडणीस, पोउनि. अमोल पवार, पोहेकॉ अभिमन महादु पाटील, पोना.भगवान अजब उमाळे, पो.ना. सुभाष रमेश घोडेस्वार, पोना. दिपक प्रभाकर पाटील, पोना विनोद विठ्ठल भोई, पोकॉ विनोद तुकाराम खैरनार, पोकॉ. निलेश हिरालाल पाटील, मपोशि सबा शेख, चापोना. नितीन गंगाराम वाल्हे, चापोकॉ. महेश अरविंद बागुल आदिच्या पथकाने केली आहे.

ताज्या बातम्या

रितू तावडे सुषमा अंधारे अन् किशोरी पेडणेकरांवर चांगल्याच भडकल्या; म्हणाल्या, “मी...

0
मुंबई । Mumbai मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याने संपूर्ण शहराला झोडपून काढले आहे. मात्र, याच पावसाने मुंबईकरांच्या मान्सूनपूर्व सुरक्षेचा...