नाशिक। प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि. ४) धक्कादायक घटना उघड झाली आहे. पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाच्या मातेशी ओळख वाढवत एका संशयित महिलेने ऐन डिस्चार्जच्यावेळी मातेच्या डाेळ्यादेखत बाळ चाेरी करुन पळ काढला आहे.
- Advertisement -
घटनेची माहिती कळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, सरकारवाडा पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड व गुन्हेशाखा युनिट एकचे पथक दाखल झाले. महिलेचे हे कृत्य काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले असून काही सीसीटीव्हींत बिघाड असल्याने संशयित महिलेची ओळख पटण्यात अडचण वाढली आहे.
दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली असून नाशिक पाेलीस दल पळवून नेलेल्या बाळासह महिलेचा शाेध घेत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा