Sunday, October 4, 2026
Homeदेश विदेशराजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू

दिल्ली । Delhi

राजस्थानच्या चूरू जिल्ह्यात आज सकाळी लष्कराचं लढाऊ विमान अपघातग्रस्त झालं. रतनगढ तालुक्यातील भानुदा गावात हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला असून, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच राजलदेसर पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरू असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार...