Saturday, July 25, 2026
HomeनाशिकNashik News: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भलेमोठे लिंबाचे झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी...

Nashik News: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भलेमोठे लिंबाचे झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय (Nashik Collector Office) परिसरात आज एक मोठी दुर्घटना टळली. येथील पार्किंग (Parking Area) क्षेत्रात असलेले एक भलेमोठे लिंबाचे झाड (Big Tree Fall) अचानक तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर कोसळले. या अपघातात तब्बल ८ ते १० वाहनांचे प्रचंड नुकसान (Vehicels Damage) झाले असून, यामध्ये काही खासगी आणि शासकीय वाहनांचाही समावेश आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ होती. पार्किंगमध्ये अनेक शासकीय अधिकारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांची वाहने उभी होती. अचानक पार्किंगमधील जुने आणि भलेमोठे लिंबाचे झाड मुळासकट उन्मळून गाड्यांवर पडले. झाडाचा पसारा प्रचंड असल्याने त्याखाली दाबल्या गेल्याने ८ ते १० चारचाकी गाड्यांचा चक्काचूर झाला.

झाड कोसळताच मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. सुदैवाने, झाड पडले त्या क्षणी वाहनांमध्ये किंवा झाडाखाली कोणीही नागरिक उपस्थित नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी वा दुखापत झालेली नाही, ज्यामुळे प्रशासनाने सुटकेचा विश्वास सोडला आहे.

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील आणि वाहनांवरील झाडाच्या फांद्या कापून गाड्या बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रशासनाकडून परिसरातील इतर धोकादायक झाडांची पाहणी करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

0
नेवासा | Newasa येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत...