Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालकाचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालकाचा मृत्यू

सटाणा | वार्ताहर Satana

- Advertisement -

बागलाण तालुयातील मुंजवाड येथे एका अठरा महिन्यांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुदैवी घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुंजवाड येथील सतीश धर्मा सूर्यवंशी यांचा मुलगा शौर्य (१८ महिने) सायंकाळच्या सुमारास घराजवळ खेळत होता. खेळताना तो नकळतपणे जवळच असलेल्या उघड्या पाण्याच्या टाकीकडे गेला आणि त्यात पडला. काही वेळाने शौर्य दिसत नसल्याने कुटुंबीयांनी चिंतेतून त्याचा शोध सुरू केला. दरम्यान टाकीजवळ पाहणी करत असताना शौर्य पाण्यात आढळून आला. त्याला तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.

शौर्य हा धर्मा केदा सूर्यवंशी यांचा नातू असून, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापारी सतीश सूर्यवंशी यांचा मुलगा होता. या घटनेने सूर्यवंशी व खैरनार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...