नाशिक । प्रतिनिधी Nashik
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा जात पडताळणी समिती, नाशिक कार्यालयातर्फे आजपासून ४ जुलै २०२५ पर्यंत जात पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. समितीचे सदस्य सचिव योगेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
- Advertisement -
या मोहिमेंतर्गत बारावी विज्ञान शाखेतील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधत प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. सीईटी परीक्षा देणारे व उत्तीर्ण झालेले आणि पदविका वर्गाच्या तृतीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत, असेही समितीने कळविले आहे.




