नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi
आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. दोन गाड्या उशिराने धावल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.
- Advertisement -
गर्दीमुळे चार महिला बेशुद्ध पडल्या आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरी झाली.
घटनास्थळी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. रेल्वे पोलिस आणि दिल्ली पोलिस गर्दी नियंत्रित करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान रेल्वेने दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.