मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून चातका सारखी वाट बघणाऱ्या मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर भारतात मान्सूनचे अखेर आगमन झाले आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जाहीर केली. केरळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू होता, पण आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. १ जूनला मॉन्सून दाखल होणार होता मात्र तो आज दाखल झाला आहे.
याबाबत बोलताना हवामान विभागाने माहिती दिली की, भारतात मान्सूनचे प्रवेश केला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. उद्या संध्याकाळ पर्यंत मान्सून संपूर्ण केरळचा भाग व्यापलेला असेल.
मान्सून दक्षिण महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात दाखल होईल. विदर्भात १५ जून नंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढचे २ ते ३ दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
Virat Kohli: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर
पुढील २-३ दिवसात मोसमी वारे महाराष्ट्रातील काही भाग व्यापू शकतात, अशी भारतीय हवामान विभागाची माहिती आहे. पुढील 2-3 दिवसांत गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, सोबतच तामिळनाडू, कर्नाटक, बंगालचा उपसागराचा काही भाग आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती आहे.
मान्सूनचे उशीरा आगमन
यंदा मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने झाले असून, अखेर मान्सून ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळमध्ये सामान्यतः १ जून रोजी येणारा मान्सून यंदा तीन दिवस उशिराने आला असला, तरी सध्या पुढील प्रवासासाठी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल आहे. येत्या ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्रासह कोकण भागात पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस
विदर्भात साधारणतः 15 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होतो. विदर्भात पुढील काही दिवस वादळीवाऱ्याचा मध्यमस्वरूप आता पाऊस होईल. मात्र आता येणारा पाऊस हा अवकाळीच असेल, कारण मान्सूनच्या अनुषंगाने अजून विदर्भात अनुकुल वातावरण निर्माण व्हायचे आहे, असेही प्रवीण कुमार म्हणाले.
विदर्भाला ऑरेंज अलर्ट
विदर्भातील काही जिल्ह्यांत येत्या 24 तासात काही ठिकाणी वादळासह तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशपासून विदर्भ होत रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंजावत तयार झाला आहे. याच्या प्रभावाने येत्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यात विजा आणि वादळासह तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्यम स्वरूपाच पाऊस आणि वादळी वारा असणार आहे. पण अवकाळी पाऊस असेल, हा मान्सून पूर्व पाऊस नसेल. विदर्भाला मान्सूनसाठी अजून प्रतिक्षा कायम असणार आहे… मात्र 10 जून नंतर परिस्थितीच्या अनुषंगाने याचा अंदाज घेता येईल.
दरम्यान, भीषण उष्णतेने हैराण झालेल्या भारतातील उत्तर पश्चिम राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. ३० जूनपर्यंत मान्सून संपूर्ण देशाला व्यापेल असं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. राजधानी दिल्लीपर्यंत मान्सून पोहचण्यासाठी २५ ते ३० जून कालावधी लागू शकतो. उत्तर प्रदेशात मान्सून १५ जूनच्या आसपास दाखल होऊ शकतो.




