Sunday, October 4, 2026
Homeक्रीडाVirat Kohli: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून...

Virat Kohli: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर

मुंबई | Mumbai
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघ आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. भारत विरुध्द अफगाणिस्तान एक दिवसीय मालिकेची सुरवात १३ जून पासून सुरु होणार आहे. त्या आधीच वाईट बातमी समोर आली आहे. विराट कोहली हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर गेल्याचे वृत्त आले आहे. बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.

आयपीएल २०२६ चा हंगाम विराट कोहलीसाठी अत्यंत शानदार ठरला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू कडून खेळताना त्याने १६ सामन्यांमध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांच्या मदतीने तब्बल ६७५ धावा काढल्या होत्या. गुजरात विरुद्धच्या अंतिम सामन्यात कोहलीने अवघ्या अर्धशतकी ७५ धावांची मॅच-विनिंग खेळी खेळली होती, ज्याच्या जोरावर आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

- Advertisement -

Vikram Kakade: कोट्यावधींची मालमत्ता, आलिशान बोटी अन् जय पवारांना दिलं इतक्या कोटींच कर्ज; विक्रम काकडेंच्या मालमत्ता वाचून व्हाल थक्क

दुखापतीमुळे कोहली सामन्याबाहेर
विराट कोहलीने आयपीएल सामन्याच्या अंतिम सामन्यात ४२ चेंडूमध्ये ७५ धावांची खेळी खेळली. अंतिम सामन्यामध्ये विराट कोहलीला धावताना त्रास होत असल्याचे पाहायला मिळाले होते. मैदानावर खेळताना त्याला तब्बल तीन वेळा फिजिओची मदत घ्यावी लागली होती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला असून, त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय सामन्याच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली खेळणार की नाही याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर विराटला झालेल्या दुखापतीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली आता अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर गेला आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : अखेर बेग, जेधे टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर येथील बेग, जेधे टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाईच्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार...