जळगाव jalgaon। प्रतिनिधी
कांदा, कापूस या पिकाच्या हमीभावासह महागाईविरोधात (Against inflation) काढण्यात आलेल्या मोर्चातील (morcha) ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी (Chief functionary of Thackeray group) आणि जिल्हाधिकारी (Collector) अमन मित्तल यांच्या दालनात मोर्चाच्या परवानगीच्या विषयावरून शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जोरदार शाब्दीक (literal argument) वाद झाला. जिल्हाधिकारी आणि ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यात इंग्रजीतून संवाद होऊन चकमक उडाली.
पोटच्या मुलाचा केला खून, आईसह भाच्याला झाली जन्मठेप
ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी शुक्रवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास कांदे, कापूस, प्रतिकात्मक गॅस सिलिंडर घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकार्यांच्या दालनात दोन तीन पदाधिकारी येताच त्यांना मोर्चाची परवानगी आहे का ? असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी विचारताच, पदाधिकार्यांनी आताच आणली आहे, असे सांगत, बाहेर उभे असलेले शिवेसेनेचे अरविंद सावंतसह पंचवीस ते पन्नास पदाधिकार्यांना सोबत आणले.
यामुळे जिल्हाधिकारी आंदोलकांवर अक्षरश: भडकले. त्यांनी आलेल्या पदाधिकार्यांशी इंग्रजीत संवाद साधून आंदोलनाची ही पध्दत योग्य नसल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाधिकार्यांनी जिल्हापेठ पोलिस निरीक्षकांना अशा प्रकारचा मोर्चा येणार असे आम्हाला का कळविले नाही ?याबाबत जाब विचारला. सुमारेे दहा मिनीटे परवानगीच्या विषयावरून जिल्हाधिकारी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांमध्ये हा वाद झाला.
…अन तरुणीसह दोघांवर दाखल झाला गुन्हा
मेळाव्यानंतर निघाला मोर्चा
शुक्रवारी दूपारी शिवसेनेचा मेळावा होता. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर जळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे महागाईच्या विरोधात गॅस सिलेंडर व पेट्रोल डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या सरकारच्या (भाजप-शिंदे सरकार) करायचे काय ? खाली डोके वर पाय, शिवसेनेचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, यासह अनेक घोषणांनी जिल्हाधिकारी दणाणला होता. कापसाला दर मिळत नसल्याने कापूस शेतकर्यांच्या घरात पडून आहे. कांद्याला मिळत नसल्याने शेतकर्यांचे मोठे नूकसान होत आहे. दररोज महागाई वाढत आहे.
यामुळे नागरिक केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. वाढलली महागाई कमी करावी, कापसाला चांगला दर मिळावा, कांद्याची खरेदी शासनाने करावी, जिल्हयात अतीवृष्टीने झालेल्या शेतकर्यांना मदत करावी, गॅस सिलिंडरचे दर कमी करावे, शेतमालाला हमी भाव द्यावा, शेतकर्याचे पंपाचे वीज बिल माफ करावे. कापसाला 12000 रुपये हमीभाव द्यावा. सर्व ठिकाणी दरवाढ होत आहे अन्यायकारक दरवाढ रद्द करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरवाढीचा व सरकारचा निषेध करीत आहोत, असे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्यांना कापूस आणि कांद्याची माळ भेट म्हणून देण्यात आली.
मोर्चात यांचा होता सहभाग
शिवसेनेचे जळगाव संपर्क प्रमूख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी (पाचोरा), महिला जिल्हा संघटीका महानंदाताई पाटील, शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, युवा सेना जिल्हाधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, जिल्हा समन्वयक गजानन मालपूरे, डॉ. दीपक राजपूत आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.