Thursday, May 7, 2026
Homeक्राईमNewasa : श्रीरामपूरच्या महिलेने सोनईच्या व्यक्तीकडे केली दहा लाखाची मागणी

Newasa : श्रीरामपूरच्या महिलेने सोनईच्या व्यक्तीकडे केली दहा लाखाची मागणी

अर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ कॉल व्हायरल करण्याची धमकी

सोनई |वार्ताहर| Sonai

येथील व्यक्तीच्या मोबाईलवर मेसेज करून अर्धनग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील महिलेसह ब्राह्मणी तालुका राहुरी येथील चार व्यक्तींवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पसार असून अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, सोनई येथील 66 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, दि. 20 ते 27 फेब्रुवारी पर्यंत वेळोवेळी श्रीरामपूर येथील महिलेने फिर्यादीस मोबाईल फोनवर मेसेज करून फिर्यादीचा अर्धनग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची मागणी केली. 10 हजार रुपये घेऊन उर्वरित पैसे न दिल्यास नातेवाईकांना व्हिडिओ व मेसेज दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीकडून पैसे घेण्याकरिता फिर्यादीचे मोटरसायकलची चावी घेऊन फिर्यादीस दोघांनी बळजबरीने मोटरसायकलवर बसवून एसबीआय बँकेमध्ये आणले.

या फिर्यादीवरून आरोपी महिलेसह अनिकेत अशोक नेटके, किशोर जयसिंग साळवे, कृष्णा सुभाष वैरागर, गौरव अरुण वाघमारे सर्व रा. ब्राह्मणी ता. राहुरी यांच्यावर बीएनएस कलम 308(2), 137,332, 351(2), (3), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बी. जी. बाचकर हे करत आहे. याप्रकरणी ब्राह्मणी येथील चार आरोपींना सोनई पोलिसांनी तात्काळ अटक केली असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या हनी ट्रॅप प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तपासी अधिकार्‍यांनी कॉल डिटेल्सची माहिती घेतली तर अनेक प्रकरणे यातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : निर्मळपिंपरी बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणी श्रीरामपुरातील डॉ. कुटेसह दोन...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत...