Tuesday, September 29, 2026
Homeनगरकोपर्डी अत्याचार-हत्या प्रकरण; हायकोर्टाचे न्यायमूर्ती स्वतः करणार घटनास्थळाची पाहणी

कोपर्डी अत्याचार-हत्या प्रकरण; हायकोर्टाचे न्यायमूर्ती स्वतः करणार घटनास्थळाची पाहणी

मुंबई | Mumbai

कोपर्डी (अहिल्यानगर) येथे 2016 मध्ये एका 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोन दोषींना सत्र न्यायालयाने सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची पुष्टी करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम 310 अंतर्गत हा निर्णय घेतला. त्यानुसार 2 ऑक्टोबर रोजी खंडपीठातील दोन्ही न्यायमूर्ती कोपर्डी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...