Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : कारच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

Nashik News : कारच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik

भरघाव स्विफ्ट कारच्या धडकेत दुचाकीवरील तरुणी जागीच ठार तर तिघे दुचाकी धारक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर नाक्याजवळील होंडा शो रूम समोर घडली असून शीतल काशिनाथ खरोटे 30 रा,अविनाश पार्क रो हाउस श्रीकृष्ण नगर,पंचक जेल रोड असे आहे,तर जखमींना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

- Advertisement -

या बाबत ची माहिती अशी की शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संशयित स्विफ्ट कार चालक ज्ञानदेव मोतीराम सोनवणे 59 खोडे मळा,सिडको हे त्यांची स्विफ्ट कार एम,एच,15 डी एस,1304 हिने नाशिकरोड हून नाशिककडे जात असताना उपनगर नाक्यावरील होंडा शो रूम समोर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शो रूम मधून दुचाकीवरून येणारया शीतल हिला जोरदार धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर याच ठिकाणी दुचाकीवर उभे असलेले सनी कोरी,रवींद्र कोरी प्रशांत नगर,पाथर्डी फाटा,यांच्यासह ओला वाहन बघायला आलेल्या तिघा जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात स्विफ्ट चालक सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अधिक तपास उपनगर पोलिस करीत आहेत,

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; जून-जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै...