Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAnjali Damania: अजित पवारांच्या घराबाहेरील भानामतीशी खरातचा संबंध? अंजली दमानियांचा खळबळजनक दावा,...

Anjali Damania: अजित पवारांच्या घराबाहेरील भानामतीशी खरातचा संबंध? अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाल्या?

मुंबई | Mumbai
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. एसआयटीकडून खरातशी संबंधित सर्व माहिती लवकराचत लवकर समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर या प्रकरणाची अशी काही माहिती समोर आणली आहे की यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. यामध्ये त्यांनी राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या घराबाहेर ज्या दिवशी भानामतीचा प्रकार घडला होता त्यामध्ये भोंदू अशोक खरातचा हात असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज माधमांशी संवाद साधताना अशोक खरात प्रकरणी अनेक आरोप केले. रुपाली चाकणकरांसोबत त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे खरातसोबत संबंध असल्याचा दावा केला.

- Advertisement -

यावेळी त्या म्हणाल्या की, खरात हा मोठा कसा झाला? त्याला मोठे करणारे सर्व राजकारणी, अधिकारी होते. ते सर्व त्याच्या दिमतीला होते. काही राजकारणी नुसते भविष्य पाहायला किंवा कोणाच्या सांगण्यावरून गेले होते. मात्र, काही राजकारणी संधीसाधूपणा करायला आणि काही साध्य करायला नक्कीच गेले असतील. म्हणून ज्या राजकारण्यांची नावे सापडले, त्यांची नावे वाचून दाखवते, असे यावेळी दमानिया यांनी सांगितले.

Rohit Pawar: अजित दादांच्या कार्याकडे बघून शंभर टक्के मतदान; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

अजित पवारांबाबत मोठा दावा
अजित पवारांच्या पुण्यातील घराबाहेर ज्या दिवशी भानामतीचा प्रकार घडला त्याच दिवशी अशोक खरातने एका हॉटेलमध्ये बसून पैशांचे मोठे व्यवहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. १७ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार झाला आणि त्याच दिवशी अशोक खरातने ३४ सेकंदात मोठे व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताशी अशोक खरातचा काही संबंध आहे का याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली.

भोंदू खरातच्या संपर्कात कोण-कोण? अंजली दमानियांनी अनेक मंत्री, त्यांचे पीए, आमदारांचे कनेक्शन आणले समोर

अपघाताशी अशोक खरातचा संबंध?
अंजली दमानिया म्हणाल्या की, “27 ते 31 जानेवारी या दरम्यान समता प्रतिष्ठानमध्ये अफाट भ्रष्टाचार झाला आहे. अजित पवारांच्या घराबाहेर १७ जानेवारी रोजी भानामतीचा प्रकार झाला होता तेव्हा अशोक खरात हा ठाण्यात आला होता. तेव्हा एका हॉटेलमध्ये फक्त ३४ सेकंदात खूप मोठे पैशांचे व्यवहार झाले होते. याबाबत आता पोलिसांनी चौकशी केली पाहिजे.”

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, “27, 28 आणि 29 जानेवारी रोजी 5 कोटी 33 लाखांचे व्यवहार झाले आहेत. ⁠हे पैसे कुठून आले, कोणी आणले, कशासाठी आणले हे शोधायला पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी व्हायला हवी.”

अशोक खरात प्रकरणात बोलायला सुरू केलं तर दिवस कमी पडेल. खरातला मोठं करणारे राजकारणी आणि अधिकारी आहेत. ⁠काही राजकारणी नुसते भविष्य विचारायला गेले असतील, मात्र काही राजकारणी नक्कीच काहीतरी साध्य करायला गेले होते, असा आरोप दमानिया यांनी केला.

अंजली दमानियांनी यादीच वाचून दाखवली
यावेळी अंजली दमानिया यांनी राजकारण्यांची नावे वाचून दाखवली. नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील आणि त्यांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे (सिन्नरचे उमेदवार), विधान परिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर (मंत्री भुसेंचे पीए), दीपक केसरकर, राहुल कोतडे (मंत्री विखे पाटील OSD), सुनील तटकरे आणि नवीन नाव म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील. हे नाव वाचून नक्कीच दुःख झाले. कारण, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कारण, ते अशा बाबांकडे भविष्य विचारायला किंवा काय विचारायला जातील. परंतु, त्यांना कोण घेऊन गेले की अजून काय. मात्र, यामध्ये जयंत पाटील यांचे नाव वाचून दुःख झाले. कारण त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी कदाचित चुकीची असेल. परंतु, मला ही व्यक्ती आतापर्यंत चांगली वाटायची असे म्हणत त्यांनी जयंत पाटलांविषयी आपले मत व्यक्त केले.

ताज्या बातम्या

Rahuri : लाखो शेतकरी अडकले कर्जमाफी अटींच्या कचाट्यात !

0
उंबरे | Umbare महाराष्ट्रातील शेतकरी अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकर्‍यांचे कर्जबाजारीपण सातत्याने...