Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAaditya Thackeray: चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…'! ठाकरे गटाचे आमदार आदित्य...

Aaditya Thackeray: चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…’! ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी नाराजीनाट्यावरुन एकनाथ शिंदेंना डिवचलं

मुंबई | Mumbai
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षातील नेतेमंडळींना फोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश दिले जात असल्याच्या कारणातून शिवसेना शिंदेगटाच्या मंत्र्यांनी रागवून मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकून मनातला रोष दाखवून दिला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सद्यस्थितीत घडणाऱ्या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली.

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या या नाराजी नाट्यावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. आज परत कोणीतरी गावी जाणार असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तुमच्या स्वत:च्या आणि पक्षाच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणे म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रिमंडळ बैठका या जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या मंत्र्यांना सुनावले आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंनी नेमके काय पोस्ट केली आहे?
चोर मचाये शोर!
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीवर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करताना म्हटले की, ‘असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर!

चला आज परत कोणीतरी गावी जाणार…
पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रीमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…’. असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना डिवचले आहे.

दरम्यान, महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्‍यांनी बहिष्कार घातला. सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदी मंत्र्‍यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली. त्यावर उल्हासनगरमध्ये तुम्ही आधी सुरुवात केली, असे सांगत शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना झापले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

२५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

0
येवला | प्रतिनिधी एका २५ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वाघाळे येथे घडली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू...