Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar Death: विमान अपघात कसा झाला? केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या कामाला,...

Ajit Pawar Death: विमान अपघात कसा झाला? केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या कामाला, मुख्यमंत्र्यांच्या पत्राला दिलं उत्तर

मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन झाले. आज गुरुवारी शोकाकुल वातावरणात बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. पण, राज्याचे उपमुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचा विमान अपघातात मृत्यू कसा होऊ शकतो? याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांना या अपघातासंदर्भात एक पत्र पाठवले होते, त्याला आता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे.

विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानतंर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली.

- Advertisement -

पत्रात काय म्हंटले आहे?
विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरु केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल.

Ajit Pawar Death: “दादांना विमान अपघाताने आपल्यातून हिरावून न्यावे, ही शोकांतिकाच”; फडणवीसांना अजित दादांच्या जाण्याने शोक अनावर

या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ.

मुख्यमंत्र्यांनी पत्रात काय मागणी केली होती?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना अपघाताबाबत पत्र पाठवले होते. “अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातात आणखी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी पत्रातून मागणी केली होती. भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, यादृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावी, अशीही पत्रातून मागणीही फडणवीस यांनी केली होती.

ताज्या बातम्या

Shirdi : खा. वाकचौरे शिंदे गटाच्या संपर्कात आल्याने शिर्डीत शिवसैनिकांचा संताप

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी राजकीय वातावरण कमालीचे तापलेले असतानाच, शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने शिर्डीत...